लखपती दीदी योजना अर्ज मंजूर होण्यास सुरुवात, महिलांना मिळणार 5 लाख रुपये
Lakhpati didi yojana form : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सध्या राज्यात चांगलीच चर्चा आहे. राज्य सरकारनं सुरु केलेल्या या महत्त्वकांक्षी योजनेनुसार लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिना दीड हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्यापूर्वी जमा झाला आहे. त्यामध्ये दोन महिन्यांचे एकत्र 3 हजार रुपये मिळाले आहेत. दुसरा हप्ताही लवकरच जमा केला जाईल, असं सरकारनं स्पष्ट केलंय. ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणेच ‘लखपती दीदी’ योजनेबाबतही राज्यात सध्या चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच या योजनेबाबतचा कार्यक्रम जळगावमध्ये झाला.
लखपती दीदी योजना महिलांना मिळणार 5 लाख रुपये
👉 इथे करा अर्ज 👈
कधी झाली सुरुवात?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण करताना ‘लखपती दीदी’ योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. आर्थिक दृष्ट्या वंचित असलेली महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारनं ही योजना सुरु केली आहे.
लखपती दीदी योजना महिलांना मिळणार 5 लाख रुपये
👉 इथे करा अर्ज 👈
काय आहे पात्रता ?
लखपती दीदी योजनेसाठी पात्रतेच्या अटी प्रत्येक राज्यांमंध्ये काही प्रमाणात वेगळ्या आहेत. पात्रतेचे सामान्य निकष खालीलप्रमाणे
या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करु शकतात लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवाशी असावी. त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न 3,00,000 (तीन लाखांपेक्षा) कमी असणे आवश्यक. महिलेचे वय 18 ते 50 दरम्यान असावे या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे.