Groom Funny Dance Video: नवरदेवाचा असा डान्स तुम्ही कधीच पाहिला नसेल.
Groom Funny Dance Video: लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात आजकाल लग्नात खास डान्स परफॉर्मन्स करणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे.
सोशल मीडियावर अनेकदा लग्नसोहळ्यातील असे डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक वरातीतला डान्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक नवरदेव वरातीत अगदी आनंदात जबरदस्त डान्स करताना दिसतोय.