ladaki bahin list.

दरम्यान, या योजनेसाठी निकष बदलण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे अनेक लाभार्थी महिला या योजनेतून अपात्र ठरतील अशी शक्यता वर्तवण्यात आली. पात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी होणार का? यावर आदिती तटकरे म्हणाल्या, “यासंदर्भातील भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे. याबाबतची पुनर्पडताळणी करण्यात येईल. तक्रारी आल्या असतील तर योग्यपद्धतीने तपासून घेतल्या जातील. सरसकट पुनर्पडताळणी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. निकषही बदलले नाहीत.” “स्थानिक पातळीवर, तलाठी कार्यालय, योजना पोहोचवण्याऱ्या यंत्रणा, आशा सेविका, सेवा सुविधा केंद्रात लाभार्थ्यांसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याची चौकशी केली जाईल. डीबीटी करताना जाणवलं की एकाच आधारकार्डवर नोंदणी झालेल्या आहेत, तेव्हा आम्ही कारवाई केली आहे”, असंही आदिती तटकरे म्हणाल्या Aditi tatkare ladaki bahin list.