विशेष म्हणजे त्यांना महिन्याकाठी दहा हजार रुपये इतके मानधन दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे ही पदे भरण्यात असली, तरी ती कायमस्वरूपी भरणे महत्त्वाचे आहे. प्रशासनातील पदांची भरती न झाल्याने त्याचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. कार्यशाळा असो किंवा वाहतूक त्याची स्थिती याहून निराळी नाही. राज्यातील MSRTC Bharti अन्य विभागांशी स्पर्धा करताना कोल्हापूर विभागाला येत्या मार्च २०२५ पर्यंत पहिल्या तीन क्रमांकात येण्याचे आव्हान पेलायचे आहे. ते पेलण्यासाठी पदांची भरती होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर ही भरती प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी, इतकीच प्रवासी वर्गाची अपेक्षा आहे.