Viral : “करमन लगन” खानदेशी गाण्यावर नवरा-नवरीनं हळदीला केला भन्नाट डान्स; नातेवाईकही पाहतच राहिले

Viral video: लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. त्यात नवरा नवरीचे व्हिडीओ तर प्रचंड व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नवरा नवरीनं आपल्या हळदीला खानदेशी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment