तूपात तूप गायीचे…. आजोबांनी आजींसाठी घेतला भन्नाट उखाणा, सुंदर नात्याचा Viral Video एकदा बघाच

आजी-आजोबांच्या सुंदर नात्याचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आजोबांनी आजींसाठी उखाणा घेतला आहे.

प्रत्येक व्यक्ती प्रेम मिळवण्यासाठी धडपडत असतो पण प्रेम म्हणजे नक्की काय आहे हे मात्र बऱ्याच लोकांना माहित नसते. अनेक तरुण-तरुणी चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या प्रेम कथा पाहून भुलतात पण खऱ्या आयुष्यात प्रेम म्हणजे काय जाणून घ्यायचे असेल तर वर्षांनुवर्ष संसार करणाऱ्या आपल्या आजी-आजोबा आणि आई-वडीलांकडे एक बघा. आयुष्यात अनेक चढ-उतार आले तरीही एकमेकांची नेहमी साथ देतात हेच खरे प्रेम असते. सध्या अशाच एका आजी-आजोबांच्या सुंदर नात्याचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आजोबांनी आजींसाठी उखाणा घेतला आहे.

सहसा महिला आपल्या पतीसाठी उखाणा घेतात पण आजोबांनी आपल्या पत्नीसाठी उखाणा घेऊ अनेकांची मन जिंकले आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आजी-आजोबांशी संवाद साधत आहे. दरम्यान उखाणा घ्यायला सांगितल्यानंतर आजोबा आजींसाठी एक भन्नाट उखाणा घेतात. “तुपात तूप गायीचे सोजरीच्या वेणीला फुल जाईचे” आजी आजोबांच्या नात्यातील साधेपणा आणि निस्वार्थ प्रेम दर्शवणारा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

Leave a Comment