आगरी-कोळी गाण्याचा नादच भारी! मुंबई लोकलमध्ये महिलेचा भन्नाट डान्स, VIDEO पाहून कराल कौतुक January 5, 2025 by Rushi Woman dance in mumbai local: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. प्रसिद्धीसाठी किंवा स्वत:च्या आनंदासाठी अनेक लोक मेट्रोत, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर डान्स करताना आपल्याला दिसतात. काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’, ‘पीलिंग्स’, ‘तांबडी चांबडी’, ‘आज की रात मजा हुस्न का…’ ही गाणी खूप चर्चेत आली आहेत. त्यावर लाखो लोकांनी रील्स बनवलेल्या पाहायला मिळत आहेत. पण, सध्या एका महिलेने मुंबई लोकलमध्ये आगरी-कोळी गाण्यावर डान्स केला आहे, जो तुफान व्हायरल होतोय View this post on Instagram A post shared by Vibhuti Sawant (@sawantvibhuti911)